Ad will apear here
Next
‘पालघर पोटनिवडणुकीत ‘कर्नाटक’चे प्रतिबिंब दिसेल’
पालघर : ‘कर्नाटकच्या विजयाचे प्रतिबिंब पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालातही दिसेल,’ असा विश्वास भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी व्यक्‍त केला.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना कर्नाटकमध्ये भाजपने जबरदस्त कामगिरी करत एकहाती विजय खेचून आणला आहे. या निकालाबद्दल मत व्यक्त करताना ते बोलत होते. ते म्हणाले, ‘फक्त कर्नाटकच नव्हे, तर गेल्या साडेतीन ते चार वर्षांत देशभरातील विविध राज्यांत भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती कर्नाटकमध्ये झाली असून, या विजयाचे प्रतिबिंब पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत नक्कीच उमटेल.’

याच मुद्यावर बोलताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘काँग्रेसच्या जातीय राजकारणाला कर्नाटकमधील मतदारांनी संपूर्णतः नाकारले आणि भाजपच्या विकासाधारित राजकारणाला पसंती दिली, तसाच ट्रेंड पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतही दिसेल. कर्नाटकच्या विजयाबद्दल तेथील मतदारांचे आभार मानत हा विजय म्हणजे भाजपच्या दक्षिण दिग्विजयाची सुरुवात आहे.’

‘खरेतर कर्नाटकमध्ये काँग्रेसने जातीय राजकारण करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला; मात्र कर्नाटकातील मतदारांनी जातीयतेला थारा न देता भाजपने सुरू केलेल्या विकास केंद्रीत राजकारणालाच पसंती दिली. या विजयामुळे भाजपच्या दक्षिण दिग्विजयाला सुरुवात झाली असून, भविष्यात यापेक्षा मोठा विजय भाजपला मिळेल,’ असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZRKBO
Similar Posts
कोकण विकास मंचचा भाजपला जाहीर पाठिंबा पालघर : जिह्यातील सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे यांच्या कोकण विकास मंचाने भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर भाजपला पाठिंबा देत असल्याची घोषणा सांबरे यांनी केली.
‘महायुती’कडून राजेंद्र गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी हजारो कार्यकर्ते आणि मतदारांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पाचबत्ती ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान यानिमित्ताने महायुतीचा भव्य रोड शो आयोजित केला होता.
बारा बलुतेदार महासंघाचा भाजपला पाठिंबा मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना बारा बलुतेदार महासंघातर्फे पाठिंबा देण्यात येत आहे, असे महासंघाचे अध्यक्ष नागेश दत्तात्रेय जाधव यांनी गुरुवारी (ता. २४) जाहीर केले.
शैक्षणिक, सामाजिक संघटनांचा भाजपला पाठिंबा पालघर : लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध समाजघटक भाजपच्या विचारधारेशी जोडले जात आहेत. पालघरसारख्या आदिवासीबहुल भागासह राज्याच्या विविध भागात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language